जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान

148 0

पुणे :हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘वरद विघ्नेश्वर वाड्यात’ विराजमान झाले. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते दुपारी पावणे एकच्या सुमारास मंत्रोच्चारात ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, बाप्पाची ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.

सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल – बालन या दांपत्याच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर भवन परिसरात तृतीय पंथीयांचे पथक ‘शिखंडी’ तर्फे दहा मिनिटांचा जोरदार गजर करण्यात आला. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. त्यानंतर गुलाबांच्या रंगी बेरंगी फुलांनी सजविलेल्या पारंपारिक रथात बाप्पाच्या मिरवणूकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ही मिरवणूक आल्यानंतर बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा पथकांनी केलेले वादन आणि ‘श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा’ पथकाने मर्दानी खेळाचे केलेले प्रात्यक्षिक प्रत्येक चौकात भाविक भक्तांचे आकर्षण ठरले. लाठी-काठी, तलवार बाजी, दांडपट्टाचे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. पुणेकर भाविकांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

यंदा गणेशोत्सवाचं १३३ वं वर्ष असून पहिल्यांदाच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या मिरवणूक रथाला बैलजोडी लावण्यात आलेली नव्हती. त्याऐवजी रथ हा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बालन दांपत्याने हाताने हा रथ ओढला.

मिरवणूक शिवाजी रस्त्यामार्गे बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोड मार्गे पुन्हा ‘वरद विघ्नेश्वर वाडा’, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे आली. त्यानंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. प्रमुख विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते ‘श्री’ची आरती करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर कैलाश खेर यांनी भाविकांनी केलेल्या मागणीला दाद देत काही गाणी सादर केली. भाविकांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला.

मिरवणूकीच्या सुरुवातीला लाठीकाठी, मर्दानी खेळ व शंखनाद झाला. त्यांनतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी देण्यात आली. शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु.म.वी, कलावंत, श्रीराम ही ढोल ताशा पथके रंगारी बाप्पाच्या मिरवणूकीत सहभागी झाली होती. त्यांच्या वादनाने मध्यवस्तीतील परिसर दणाणून गेला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पद्मश्री कैलाश खेर व पुनीत बालन स्टुडिओज यांची गजवंदना प्रदर्शित करण्यात आली.

‘‘आपण सर्वजण आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतो तो आजचा सर्वांत आनंदाचा दिवस होता. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचं आज आगमन झालं. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या शुभहस्ते बाप्पा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण उत्सव काळात वेगवेगळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी आधिकाधिक भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केलं आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. माझ्या हस्ते प्राणप्रतिष्ठान म्हणजे मला बाप्पाचा मिळालेला आशीर्वाद वाटतो. आपल्या भारत भूमीला पवित्र आणि अध्यात्मिक बनवा, आम्हाला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवा आणि आमच्या भूमीला सुरक्षित ठेवा अशी प्रार्थना मी बाप्पाकडे केली असं प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी सांगितलं

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान मेट्रोची तांत्रिक चाचणी आज !

Posted by - December 31, 2022 0
पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर ज्या मेट्रो ट्रायलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती मेट्रो ट्रायल आज पूर्ण होत…

पुणे : आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान

Posted by - December 5, 2022 0
पुणे : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान च्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात…

मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे ; रामदास आठवले यांचा कवितेतून राज ठाकरेंना टोला 

Posted by - April 23, 2022 0
आधी गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान…
Pune Video

Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले

Posted by - November 21, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Video) पुन्हा एकदा कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हातात…

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जणांचं निलंबन

Posted by - December 11, 2022 0
पिंपरी-चिंचवड: पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून शाई फेक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *