शिवापूर टोल नाका हटवा नाहीतर आमदारांच्या घरासमोर घंटानाद; शिवापूर टोलनाका कृती समितीचा इशारा

368 0

शिवापूर येथील टोलनाका हटवण्यासाठी शिवापूर टोलनाका कृती समिती आक्रमक झाली असून या कृती समितीच्या वतीनं पुण्यातील कात्रज चौकात धरणं आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

शिवापूर टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर गेलाच पाहिजे या प्रमुख मागणीसह पुणे जिल्ह्यातील वाहनांसाठी म्हणजे MH 12 आणि MH 14 वाहनांसाठी होणारी टोल वसुली बंद व्हावी यासाठी हे धरणं आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं शिवापुर टोल नाका कृती समितीच्या मागण्यांकडं दुर्लक्ष केल्यास आगामी काळात प्रत्येक आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा शिवापुर टोल नाका कृती समितीचे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली दारवटकर यांनी TOP NEWS मराठीशी बोलताना दिला.

Share This News
error: Content is protected !!