Pune Ganpati

Pune Ganpati : पुण्यात दर्शनासाठी गणेशभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

463 0

पुणे : पुणे आणि गणपती (Pune Ganpati) यांचे एक अनोखे नाते आहे. काल 5 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. यानंतर आता पुण्यात मोठ्या आणि मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दी केली आहे. पुण्यातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. रविवार असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वांचं आकर्षण असलेला पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

गौरी-गणपती आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जसाठी शनिवारी सकाळपासूनच काही ठिकाणी गर्दी वाढली होती. तर शनिवारी सायंकाळी उशिरा या गर्दीने उच्चांक गाठला. आज रविवारी सर्वांनाच सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडले आहेत. यंदा गणेशोत्सवामध्ये एकच शनिवार-रविवार आल्याने गर्दीचे प्रमाण वाढले आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने 131 व्या गणेशोत्सवात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!