Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या ससून रुग्णालय, पोलिस आणि तुरुंग प्रशासनाची CID अथवा विशेष पथकद्वारे चौकशी करावी : आमदार रविंद्र धंगेकरांची मागणी

898 0

पुणे : ससून रुग्णालायात उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील हा तेथून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अमली पदार्थचे रॅकेट मधे आरोपी असलेला पाटील जर गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्त्यांच्या पेक्षा वेगाने कसा पळाला? तो आजारी होता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.तसेच हा वेगवेगळया आजारावर उपचार घेत होता हेही संशयास्पद आहे. त्यामुळे हा सारा घटनाक्रम संशस्पाद शासकीय यंत्रणेला चक्रवणारा आहे.

Document 21

पोलीस, ससून आणि तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागशिवाय हे घडणे शक्य नाही.असे धंगेकर यांनी गृहमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. विविध गुन्ह्याखालील अटकेत असणारे अनेक कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होतं ऐशोआराम करतात, असे माध्यमात आलेल्या वृत्तांवरून स्पष्ट होते. कुख्यात मटका किंग विरल सवलाही अशीच सेवा या तीनही शासकीय यंत्रणाकडून घेत आहे. सामाजिक जीवनात वावारताना अशा अनेक घटना कानावर येत असतात. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी पुण्यातील समाजमन भयभीत झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणे आणि त्यांना न्यायाच्या प्रक्रियेखाली आणणे आवश्यक आहे.

या साऱ्या प्रकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने याची विशेष तपास पथक (sit) नेमून चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकारणात विशेष पथक नियुक्त करावे अथवा सीआयडी मार्फत चौकशी करावी,अशी मागणीही धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!