राष्ट्र सेविका समितीचं पुण्यात विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन

100 0

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन रविवार, दि.६ ऑक्टोबर रोजी कर्वेनगर परिसरात आयोजित केले होते.

सर्वप्रथम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये ,महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या पुतळ्यास राष्ट्र सेवा समितीच्या पदाधिकार्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन,ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर

अग्रभागी दंडगण,त्यामागून खुल्या जीपमध्ये भगवा ध्वज, घोषगण आणि त्यामागून गणवेशातील सेविकाअसा पथसंचलनास प्रारंभ झाला.

कर्वे नगरातील नागरी वस्त्यांमधून जाणाऱ्या या पथ संचलनात साडपाचशे संपूर्ण गणवेशधारी सेविकांनी सहभाग घेतला. यात सर्व वयोगटातील महिला असून बाल आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींचा संचलनात, घोषवादनात आणि संचलन पाहण्यासाठीही मोठ्या संख्याने असलेला सहभाग लक्षणीय होता. महिलांचे एकंदरीत तीन घोष होते. यामध्ये वंशी / वेणु दल ( बासरी), आनकदल(साईडड्रम)आणि तालवाद्य म्हणजे झल्लरी( सिंबल), त्रिभुज(ट्रॅन्गल) आणि पणव(बेस ड्रम) यांचा समावेश होता.

शिस्तबद्ध आणि अतिशय सुंदर अशा या पथसंचलनाचे नागरिकांनी खूप उत्साहाने मोठ्या संख्येने चौकाचौकात उपस्थित राहून स्वागत केले. विविध मंडळांतर्फे भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, ध्वजाचे औक्षण करुन, फुलांची उधळण करुन, देशभक्तीपर गाणी गाऊन आणि घोषणा देऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

पुन्हा कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर संचलनाचा समारोप झाला.समारोप प्रसंगी गणवेशातील एकूण साडेसहाशे सेविका आणि दोनशे नागरिक मैदानावर उपस्थित होते.

राष्ट्र सेविका समिती, संभाजीभाग, पुणे, कार्यवाहिका मा.अनघा जोशी यांनी कार्यक्रमास सहाय्य करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

या उत्सवास राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख मा. पूनम शर्मा , प. महाराष्ट्र प्रांत कार्यवाहिका शैलाताई देशपांडे,अर्चनाताई चांदोरकर पुणे महानगर शारीरिक शिक्षण प्रमुख व संभाजी भाग कार्यकारिणी,यांची उपस्थिती होती.

तसेच पुण्याचे माननीय मंत्री आणि अनेक माजी नगरसेवकांनी आवर्जून उपस्थित राहून समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Share This News

Related Post

Pankaja Munde

Pankaja Munde : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पुण्यात घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट

Posted by - March 21, 2024 0
पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीडमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना…

भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - September 25, 2022 0
पुणे: आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर तसेच त्यांचे दीर व माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्या मोबाईलवर मेसेज करुन…
Ajit Pawar

Aditya-L1 Mission : आदित्य एल1च्या यशस्वी उड्डाणानंतर अजित पवारांनी शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

Posted by - September 2, 2023 0
भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या…
Supriya Sule

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Posted by - March 22, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी…

पिंपरीत कोट्यवधींच्या क्रिप्टोकरन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्याने केले तरुणाचे अपहरण (व्हिडिओ)

Posted by - February 2, 2022 0
पिंपरी- क्रिप्टो करन्सीच्या मोहापायी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच एका व्यक्तीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *