Vasant More

Vasant More : ‘…तर मनसेचा पहिला खासदार मीच असेल’; वसंत मोरेंचे वक्तव्य

620 0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून मोरेंची निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारसंघात आले होते. यादरम्यान त्यांनी खासदारकीबद्दल एक सूचक वक्तव्य केले. पक्षाने संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार वसंत मोरे असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

…तर मनसेचा पहिला खासदार मीच
मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदारकीवरुन पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते तुमच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहेत, असा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर वसंत मोरेंनी लगेच, “नाही, मला तर यंदा खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार होण्यासाठी मी इच्छुक आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिल्यास या वर्षी महाराष्ट्रातील पहिला मनसे खासदार हा वसंत मोरे असेल असं मला 100 टक्के वाटतं,” अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच ते पुढे म्हणाले बारामती मतदारसंघाचा संघटक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच मी येथील चारही तालुक्यांना भेट देत आहे. आज पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंडला भेट देणार आहे. चारही तालुक्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या आहेत. त्याचसाठी सध्या चाचपणी सुरु आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही बारामती मतदारसंघात जोमाने काम सुरु केलं आहे,” असे वसंत मोरे म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!