Rain Update : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला

207 0

पुणे : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आजही खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने १०० टक्के भरले आहे.

तर पुढील दोन दिवस पावसाचा इशारा असल्याने खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्यूसेक आणि मुठा नदीत सांडव्यातून ४७०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात सुरू आहे. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या ४ धरणाचा पाणीसाठा ५० टक्के झाला आहे.

धरणासाठा आणि पाऊस अपडेट १४ जुलै २०२२ ( सायंकाळी पाच वाजता)

खडकवासला        ५  मिमी,

पानशेत                 २५ मिमी,

वरसगाव                २१ मिमी

टेमघर                    ३० मिमी

पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १४.६८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी हा साठा ९.०८ टीएमसी होता. मागील वर्षापेक्षा हा ५.५० टीएमसी जास्त साठा आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!