पुणे : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला तरी खडकवासला धरण ९९ टक्के भरले आहे.
खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्यूसेक आणि मुठा नदीत ४,७०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात सुरू आहे.तर पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणाचा पाणीसाठा अनुक्रमे ५५ आणि ५१ टक्के झाला आहे.
धरणासाठा आणि पाऊस अपडेट १५ जुलै २०२२
खडकवासला ६ मिमी,
पानशेत ३० मिमी,
वरसगाव २८ मिमी
टेमघर ४० मिमी
पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १५.९४ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी हा साठा ९.३६ टीएमसी होता. मागील वर्षापेक्षा हा ६.५० टीएमसी जास्त साठा आहे.