Punit Balan

Punit Balan : सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टला प्रसाद वाटपासाठी ‘फूड व्हॅन’ ‘पुनीत बालन ग्रुप’कडून भेट

779 0

पुणे : धनकवडी येथील सदगुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे. या प्रसाद वाहतुकीसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी मठाला ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करू दिली आहे. त्यामुळे प्रसाद वाटपाचे काम आणखी सोईस्करपणे होण्यास मदत होणार आहे.

‘श्री सदगुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट’च्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत प्रसाद वाटपाचा हा उपक्रम सुरु आहे. दररोज साधारणपणे बाराशे ते पंधराशे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतात. मात्र, या प्रसाद वाटपासाठी व्हॅनची सोय नसल्याने गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी तत्काळ प्रसाद वाटपासाठी व्हॅन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. दुर्गाष्टमीच्या मूहर्तावर उद्योजिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते या व्हॅनच्या चाव्या ट्रस्टच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर, सचिव सतीश कोकाटे, प्रताप भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘‘श्री सदगुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टच्यावतीने प्रसाद वाटपाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवला जातो. त्यात या व्हॅनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून महाराजांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी ट्रस्टचे आभार व्यक्त करतो.’’ असे मत पुनीत बालन यांनी यावेळी व्यक्त केले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide