प्रेमात फसवणूक झाल्यामुळे नैराश्य आलेल्या पुण्यातील तृतीयपंथीयाने जयपुर (jaipur) मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुपा देवी माहेश्वरी (Rupa maheshwari) असं या तृतीयपंथीचं (pune Transgender) नाव असून ती गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथी रुपा जयपूरच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. दोघांमध्ये दोघांच्या संमतीने प्रेमसंबंधदेखील झाले होते. गेल्या तीन ते चार वर्ष हे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रूपा नेहमी जयपुर ला जायची. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांची भेट ही झाली नव्हती आणि रूपाच्या प्रियकराचं वागणंही बदललं होतं.
आपला मुलगा एका तृतीयपंथीच्या प्रेमात असल्याचं कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी या मुलाला तिच्याशी बोलणं बंद करायला सांगितलं. तेव्हापासून प्रियकर रूपाशी बोलत नव्हता. हाच विरह सहन न झाल्याने 13 जानेवारीला रूपा जयपुरला पोहोचली. तिथून प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास त्याची वाटही पाहिली. मात्र तो बाहेर आलाच नाही. त्यामुळेच रूपाला नैराश्य आलं.
सुसाईड नोट लिहिली…
रूपाने प्रियकराच्या घरापासून अगदी काही अंतरावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी तिने सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. रूपाचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्याच परिसरात आढळून आला. तिच्या मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आणि कीटकनाशकाची रिकामी बॉटलही सापडली. त्यामुळे या प्रकरणाची आता पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.
न्याय हक्कासाठी लढणारी रूपा
रूपा माहेश्वरी हीच पूर्वाश्रमीचं नाव सारंग पुणेकर (sarang punekar) असं होतं. अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत होती. तृतीयपंथीयांसाठी केल्या गेलेल्या अनेक आंदोलनांमध्ये तिचा सहभाग होता. गेले अनेक वर्ष तृतीयपंथी म्हणून ती आपल्या न्याय हक्कांसाठी लढत होती. ती उच्चशिक्षित होती. त्याचबरोबर उत्तम कवयित्री सुद्धा होती. नितेश राणे यांनी हिजडा शब्द वापरल्या मुळे तिने तृतीयपंथी समाजासाठी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरली होती. तिने काही दिवस काँग्रेस पक्षाबरोबर सुद्धा काम केलं होतं. याबरोबरच तिने “जोश टॉक्स” (josh talk) मध्ये आपला प्रेरणादायी प्रवास देखील सांगितला होता. त्यामुळेच रूपाच्या आत्महत्येनंतर तृतीयपंथी समाजातील प्रतिनिधींसह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (VBA Adv. prakash ambedkar) यांनी देखील तिला श्रद्धांजली वाहिली आहे.