no-water

Pune PMC Water Supply | पुण्यात 18 मे पासून पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

796 0

पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. 18 मे पासून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply ) बंद राहणार आहे. या पाणीकपातीच्या (Water Reduction) निर्णयाबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी दिली आहे. याबाबत मनपा प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांना माहिती दिली आहे.

आगामी काळात पाऊस कमी पडला तर अगोदरच अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 20 ठिकाणी एअर व्हॉल्व बसवण्यात आले आहेत त्यामुळे दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणी मिळण्याची समस्या आता कमी होण्यास मदत होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!