पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडी अध्यक्षपदी विरेन हनुमंत साठे

480 0

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत सर्वानुमते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे.

विरेन हनुमंत साठे यांची पुणे शहर युवक आघाडी, अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. वीरेन साठे हे मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत हनुमंत साठे यांचे पुत्र आहेत .विरेंन साठे यांनी रिपबलिकन पक्षात विविध पदावर कार्य केले आहे .महाराष्ट्र राज्य शासनाच्या होम गार्ड समितीवर ही त्यांनी यशस्वी रित्या काम केले. आहे .निवडीनंतर विरेन साठे यांनी वडील हनुमंत साठे यांचे दलितातील उपेक्षित समाजाला आंबेडकरी चळवळीत व रीपबलिकन पक्षात सामील करण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे .

या बैठकीत शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर, प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे ,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, संजय सोनवणे, मोहन जगताप,, महिपा य वाघमारे, बाबुराव घाडगे, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, निलेश आल्हाट,श्याम सदाफुले आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!