Pune News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विद्यापीठ चौकात आजपासून होणार वाहतूक मार्गांत बदल

2037 0

पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीमध्ये आज, शुक्रवारपासून बदल करण्यात आला आहे. औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या दुचाकीचालकांना आता सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान मिलेनियम गेटमधून प्रवेश करून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागणार आहे. मेट्रोच्या उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune News) चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोचे खांब व उड्डाणपुलासाठीचे खांब उभारण्यासाठी रस्ता खोदई व बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. यामुळे हा वाहतूकबदल करण्यात आला आहे. हा वाहतूक बदल विद्यापीठ चौकातील पुलाचे व मेट्रोचे बांधकाम संपेपर्यंत लागू असणार आहे.

असे असतील वाहतूक बदल
औंधवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीचालकांनी मिलेनियम गेट (चतुःश्रृंगी पोलिस ठाणे) मधून विद्यापीठामध्ये प्रवेश करावा. मुख्य गेटमधून बाहरे पडावे. (वेळ दररोज सकाळी 8 ते रात्री 8)
सर्व प्रकारच्या मिनी बस, बस (पीएमपी, खासगी बस) यांनी मेट्रोकामाच्या डाव्या बाजूच्या लेनचा वापर करावा.
तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजूच्या लेनचा वापर करावा.

Share This News
error: Content is protected !!