पुणे : शुल्कवाढीच्या संदर्भात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने घेतली कुलगुरू यांची भेट

605 0

पुणे : विद्यापीठ कृती समितीच्या सदस्यांनी शुल्कवाढ, वसतिगृह तसेच विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांना संदर्भात कुलगुरू यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. विद्यापीठ व विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढी विरोधात कृती समिती व इतर समविचारी संघटना एकत्र येऊन गेल्या आठ महिन्यांपासून शुल्कवाढ कमी करण्यासाठी आंदोलन, चर्चा, निवेदने इ. माध्यमातून पाठपुरावा करत आहेत.

कृती समितीने केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासन एक उच्च स्तरीय कमिटी गठित करून अहवाल सादर करणार होते. परंतु दोन महिने झाल्यानंतर देखील समितीने अहवाल सादर केलेला नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढीव शुल्कवाढीसह विद्यार्थ्यांना चलन येत आहेत. कोरोनानंतर सर्व विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे वाढीव शुल्क देणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. म्हणून कृती समितीने मा. कुलगुरू व उच्च स्तरीय कमिटीला विनंती केली आहे की, जोपर्यंत समिती आपला अहवाल सादर करत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्याकडून वाढीव शुल्क घेऊ नये .

प्रा. किरण गाढवे, प्रा.अमोघसिद्ध चेंडके, जयकर गायकवाड, प्रा. रामदास वाघमारे, तुकाराम शिंदे, राहुल ससाणे कृती समिती सदस्य येणाऱ्या काळात कृती समिती शुल्कवाढ प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत राहील. आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई लढत आहोत. आपण सर्वांनी देखील आपआपल्या परीने या संघर्षात सहभागी होऊन हा लढा अधिक मजबूत करावा, आणि शुल्कवाढ रद्द करण्यास विद्यापीठ प्रशासनास भाग पाडावे.

Share This News
error: Content is protected !!