Pune University Video

Pune University Video : खळबळजनक ! मार्कशीट देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली लाच

563 0

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University Video) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये (Pune University Video) चक्क मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे. याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळवत असल्याचं दिसतंय. मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागितल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी अभाविपकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्याचं ठरवलं. त्यानंतर नोटांचे नंबर नोंद केले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला त्याच नोटांसह पकडलं. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका कर्मचाऱ्याला मार्कशीट देण्यासाठी लाच घेताना आज अभाविप विद्यापीठ अध्यक्ष रंगा महादेव व कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. दिवसेंदिवस परीक्षा विभागाचा भ्रष्टाचार वाढतच चालला आहे. आता विद्यापीठ प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकारावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा परीक्षा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डाच झाल्याचे समजत आहे.

Share This News
error: Content is protected !!