PMPML

Pune Traffic Update: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीच्या वाहतुक मार्गात बदल

512 0

पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. उद्या गुरुवारी पुण्यात दहीहंडीचा थरार (Pune Traffic Update) पुणेकर अनुभवणार आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातून नागरिक पुण्यात येत असतात. या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी पाहता पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हा बदल तात्पुरता स्वरूपाचा असणार आहे.

पीएमपीच्या वाहतुकीत असा असेल बदल
बसमार्ग क्र. 50 शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 113 अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, 144 अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 174 ही बस गुरुवार आणि शुक्रवारी (दि. 7) रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) मनपा, डेक्कन मार्गे संचलनात राहील.
बस मार्ग क्र. 2, 2 अ, 10, 11, 11 अ, 11 क, 13, 13 अ, 28, 30, 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354, रातराणी-1, मेट्रो शटल-12 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. स्वारगेटकडून शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बस बाजीराव रोडने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 7, 197, 202 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 68 या मार्गाचे बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
स्वारगेट आगाराकडून बस मार्ग क्र. 3 व 6 हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

Share This News
error: Content is protected !!