#PUNE : वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने असे अडकवले जाळ्यात; पहा थरारक व्हिडिओ

728 0

पुणे : पुण्यातील भर वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने अथक प्रयत्नानंतर जाळ्यात अडकवला आहे. शहरातील वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात आज सोमवारी सकाळी हा बिबट्या काही जणांना दिसून आला. वनविभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आल आहे. या बिबट्याला आता राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात नेण्यात येणार असल्याचे समजत आहे.

सोमवारी सकाळी वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीमध्ये हा बिबट्या शिरला असल्याचं परिसरातील नागरिकांच्या लक्षात आलं. व्हिडिओ देखील या बिबट्याचा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे . या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती.

या परिसरात बिबट्या शिरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच वनविभागांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या बिबट्याला पकडण्यासाठी मोठी जाळी गोदामाच्या दरवाजाजवळ लावण्यात आली होती. परंतु बिबट्याने तेथूनही पळ काढला त्यानंतर इमारतीच्या एका बाजूला झाडात तो दिसून आला. त्यानंतर नऊ ते साडेनऊच्या सुमारास डॉट मारून या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. या बिबट्याला आता राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात नेण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!