PUNE PROSTITUTE CASE: पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय (PUNE PROSTITUTE CASE) करणाऱ्या एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

PUNE PROSTITUTE CASE: मैत्री खातर पैसे दिले अन् थेट… पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या

94 0

PUNE PROSTITUTE CASE: पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय (PUNE PROSTITUTE CASE) करणाऱ्या एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना

पुण्यात उघडकीस आली आहे.

तर या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय.

PUNE BUDHWAR PETH प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेला बुधवार पेठेत वेश्याव्यवसायासाठी विकलं

परंतु आरोपीने या महिलेचा खून करण्यामागचं कारण हे प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणार आहे.

या मयत महिलेचं नाव श्यामली असून तिचं वय अंदाजे चाळीस वर्षे होतं.

ती पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळा त्या ठिकाणी वास्तव्यास होती.

तिची धायरी परिसरात राहणाऱ्या नितीन चंद्रकांत पंडित या 51 वर्षीय व्यक्तीशी मैत्री होती.

मात्र याच नितीन पंडित याने श्यामलीचा अमानुष खून केला. मयत महिला आणि आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती.

ही महिला पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी जायची. तर आरोपी हा रिक्षा चालक असून तो त्याच्याच रिक्षातून तिला बुधवार पेठेत सोडायचा व पुन्हा घरी सोडायला जायचा.

याच ओळखी मधूनच त्याने शामली हिला 40-50 हजार रुपये उसने दिले होते.

PUNE WATER DAM INCREASE: पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचं संकट टळणार; खडकवासला धरण साखळी प्रकल्पात प्रकल्पात तब्बल इतका पाणीसाठा

हे पैसे देऊन अनेक दिवस झाले तरीही शामली ते पैसे परत करत नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा किरकोळ वाद झाले होते.

गुन्हा घडलेल्या दिवशी देखील आरोपी हा श्यामलीच्या घरी गेला होता.

त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाले.

हेच वाद टोकाला गेल्याने आरोपीने श्यामलीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शामली हीचा ओढणीने गळा आवळून खून केल्यानंतर

आरोपी नितीन हा स्वतःच नांदेड सिटी पोलीस ठाण्यात हजर झाला.

PUNE INDAPUR NEWS: पुण्याच्या इंदापूरमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली ही दिली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं.

त्याला 9 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या हत्येमुळे किरकोळ कारणावरून खून किंवा खुनाचा प्रयत्न होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात येत आहे.

त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!