MARATHI SAHITYA SANMELAN: 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला! 32 वर्षांनी मिळालं यजमानपद
MARATHI SAHITYA SANMELAN: यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार आहे.
हे साताऱ्यातील चौथे साहित्य संमेलन असणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA SAMELAN SATARA | ठरलं! ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी भाषेतील सर्वात प्रतिष्ठित आणि मानाची साहित्यिक परंपरा आहे.
या संमेलनाच्या आयोजना मागचा मुख्य उद्देश म्हणजे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करणे
नव्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देणे आणि साहित्यिक विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे आहे.
1878 साली पुण्यात पहिले साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. त्याला ‘मराठी ग्रंथकार परिषद’ असे नाव होते.
1906 साली ‘मराठी साहित्य परिषद’च्या वतीने पहिलं अधिकृत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत भरवण्यात आलं.
98 वे साहित्य संमेलन विज्ञान भवन, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे 21‑23 फेब्रुवारी 2025 रोजी भरवण्यात आलं होतं.
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.. तर या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, तर
संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर या होत्या. आता 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे पार पडणार आहे..
तब्बल 32 वर्षानंतर साताऱ्यात चौथ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे..यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते .
1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती.
या समितीने 5 ते 7 जून रोजी निमंत्रक स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.
