Pune Police News

Pune Police News : खाकी वर्दीतील रणरागिनी! ‘ज्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे हत्येची घटना टळली, त्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केला सत्कार

642 0

पुणे : पुण्यात (Pune Police News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांमध्ये दहशत पसरवून कोयत्याने वार केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. मात्र, एका जिगरबाज महिला कर्मचाऱ्यामुळे खुनाची घटना टळली आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सीमा मानसिंग वळवी असे आहे. त्या चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळे हत्येची घटना टळली आहे.

त्या रात्री काय घडले नेमके?
चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार सीमा वळवी या रात्रीचा बंदोबस्त संपवून घरी जात होत्या. त्यावेळी वडगाव शेरी येथील दिगंबरनगर येथे गर्दी दिसल्याने त्या थांबल्या. त्यांनी पाहिले की, काही तरुण कोयत्याने मारहाण करत आहेत. त्यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना दरडावले. त्यावेळी काहींनी तेथून पळ काढला. मात्र, एकाने कोयता काढून दुसऱ्या तरुणावर वार केले. सीमा वळवी यांनी यांनी प्रतिकार करुन जखमी तरुणाची सुटका केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. एकट्या सीमा वळवी यांनी आरोपींना प्रतिकार केला.

एका आरोपीला पकडून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली. चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस येईपर्यंत सीमा वळवी यांनी एकाला पकडून ठेवले. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे हत्येची घटना टळली. सीमा वळवे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी पकडले गेले. सीमा वळवे यांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. महिला पोलीस अंमलदार सीमा वळवी यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide