Lalit Patil

Lalit Patil : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणी ‘त्या’ दोन महिलांना अटक

469 0

पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी पुणे पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या दोन्ही महिलांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत.

ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललीत पाटीलला आश्रय देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ललित पाटील फरार होण्यापूर्वी प्रज्ञा कांबळेकडे राहिला होता. तिला नाशिक पोलिसांनी काल पुणे पोलिसांकडे स्वाधीन केले होते. प्रज्ञा कांबळेकडे ललित फरार होण्यापूर्वी एक दिवस राहिला होता.

प्रज्ञा कडून ललितने 25 लाख देखील घेतले होते. ललितने प्रज्ञाकडे मोठ्या प्रमाणावर चांदी ठेवली होती. ललित पाटील देशातून बाहेर फरार होण्याच्या तयारीत असताना चेन्नई बॉर्डरवर त्याला अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळेला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडे ललित पाटीलने मिळवलेली बेनामी संपत्ती असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!