Rajgad

Pune News : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

428 0

पुणे : पुणे जिल्ह्याच्या (Pune News) वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासिय ही मागणी करत होते.

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती.पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Cabinet Meeting : आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Lok Sabha Elections : ‘आता शिंदे राजीनामा देणार का?’ ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंच्या घोषणांमुळे मविआमध्ये धुसफूस; आंबेडकरांच्या ‘त्या’ पत्राने वाढवलं टेन्शन

Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

Ustrasana : उष्ट्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!