Pune News : यावर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार

503 0

पुणे : श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अभिनेते प्रविण तरडे, ईशान्य महेश्वरी, भारतीय क्रिकेटर केदार जाधव, डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा ही कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोना महामारीचे संकट दूर होऊन सरकारने निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यांनी एकत्र येत गतवर्षीपासून भव्य असा सार्वजनिक दहीहंडी महोत्सव सुरु केला आहे.

लक्ष्मी रस्त्यावर गुरुजी तालीम गणपती चौकात हा दहीहंडी कार्यक्रम होतो. गतवर्षी झालेल्या पहिल्याच वर्षी तब्बल 50 हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती. यावर्षी या मोहत्सवाचे दुसरे वर्ष आहे. गुरुवारी साय. 4 वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त युवा वर्गाने या दहिहंडी उत्सवासाठी उपस्थितीत राहावे असे आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!