पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी (Pune News) समोर आली आहे. 10 ऑगस्ट पासून टोरेंट सीएनजी पंपांवर CNG ची विक्री बंद राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना ट्रेड मार्जिनची 7 कोटींची थकबाकी मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल डीलर्स अससोसिएशन पुणे ने तेल कंपन्या आणि टोरेंट गॅस यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा थकबाकी मिळाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व 42 विक्रेत्यांनी 10 ऑगस्ट पासून त्यांच्या खात्यात ट्रेड मार्जिनची रक्कम रिफ्लेक्ट होयेईपर्यंत CNG ची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
