Pune Don News

Pune News : डॉन साठी पुणेकर ढसढसा रडले, लॅम्बोर्गिनी कारच्या धडकेत मृत्यू पावलेल्या ‘डॉन’ची इमोशनल INSIDE STORY

8110 0

पुणे : डॉन…..पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक चौकातील सगळ्यांचा तो लाडका होता. या भागात त्याचे अनेक ओळखीचे, जीवाभावाचे मित्र झाले होते. विशेष म्हणजे त्याला बन मस्का खूप आवडायचा. पण अचानक एक दिवशी लेम्बोर्गिनी कारने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि याच डॉनला श्रद्धांजली देण्यासाठी अनेक पुणेकर युवक रस्त्यावर उतरले. अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. अनेकांचा लाडका डॉन आता पुन्हा या रस्त्यावर कधीही दिसणार नाही. डॉन ही काही व्यक्ती नव्हती तर तो होता एक श्वान आणि तो ही भटका…आणि याच भटक्या श्र्वानाने अनेकांना लळा लावला होता. अनेकांचा मित्र असलेल्या याच डॉनची ही संपूर्ण कथा…

पुणे शहरातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास एका लेम्बोर्गिनी कारने दिलेल्या धडकेत डॉन जागीच ठार झाला. कार अपघातात ठार झालेल्या डॉनला श्रद्धांजली देण्यासाठी रविवारी गुडलक चौकात श्रद्धांजली सभा घेण्यात आली. भटके असले तरी या श्र्वानाना सुध्दा जीव असतो. बोलता येत नसलं तरी या मुक्या जीवांना आपल्या सारख्याच भाव भावना असतात. आणि अतिशय निर्दयीपणे भरधाव कार चालक प्रसाद नगरकरने डॉनला 25 ते 30 फूट अंतरावर फरफटत नेलं. अनेक प्राणी प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे अखेर त्या डॉन ला न्याय मिळाला. सामजिक कार्यकर्त्या नीना नरेश राय यांनी केलेल्या तक्रारीमुळे कार चालकावर गुन्हा दाखल झाला असून त्याची महागडी गाडी जप्त करण्यात आली आहे. गुडलक चौकातील श्रद्धांजली सभेत मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यासह प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि प्राणी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसाच भटक्या कुत्र्यांनाही आहे. असं मत वसंत मोरे यांनी व्यक्त केलं.

मुक्या जनावरांना त्रास देऊ नये असं आपण कायम ऐकतो, कारण मुके असले तरी त्यांनाही जीव आहे. पण डॉनच्या घटनेने माणुसकी खरचं हरवली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक मतमतांतर पाहायला मिळाली. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्या प्रमाणे इथेही अनेकांनी भटक्या श्र्वानांमुळे किती त्रास होतो, ते अंगावर येतात, अनेकदा गाडीच्या मध्ये येतात याविषयी मत व्यक्त केलं.. महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही मत मांडल. अनेकदा लोकं भटक्या जनावरांना किड्या मुंगीसारख वागवतात…पण दगडालाही पाझर फुटावा अशी ही घटना आहे. आधी डेक्कन पोलिस तक्रार नोंदवून घेत नव्हते पण सामाजिक कार्यकर्ते, प्राणी प्रेमी संस्था, वसंत मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे या कार चालकावर गुन्हा दाखल झाला, त्याची गाडी जप्त केली…त्या डॉनला अखेर न्याय मिळाला..पण अनेकांच्या मनात घर केलेला डॉन आता पुन्हा त्या जागी नसणार हे ही तितकंच खर…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!