Pune News

Pune News : नामदेव जाधवच्या तोंडाला काळे फासले; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

600 0

पुणे : मागील काही दिवसांपासून नामदेव जाधव नावाचा इसम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर अर्वाच्च भाषेत टीका करत आहे. शाळेत असताना गैरमार्गाने गुण वाढवले म्हणून नामदेव जाधव याला विद्यार्थी, पालक व शाळा प्रशासनाने धक्के मारून शाळेतून हाकलून लावलं होतं. नामदेव जाधवच्या विरोधात विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हाही दाखल आहे. सध्या जामीनावर फिरत असलेला नामदेव जाधव राज्य सरकारमधील एका मंत्र्याकडून सुपारी घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर टीका करत आहे.

नामदेव जाधवच्या हा हेतुतः राज्यात ओबीसी विरूध्द मराठा असा असा संघर्ष उभा करत आहे. 1983 साली पवार साहेब मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण लागू झालं अशी बतावणी हा नामदेव जाधव करत आहे. वास्तविकतः 1983 साली पवार साहेब विरोधीपक्षनेते होते तर ओबीसी आरक्षण हे 1990 च्या दशकात देण्यात आले आहे. म्हणूनच नामदेव जाधव करत आलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे उघड करावेत अन्यथा पवार साहेबांची जाहीर माफी मागावी असा ईशारा आम्ही नामदेव जाधवला दिला होता. अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी पूर्वसूचनाही दिली होती. असे असतानाही नामदेव जाधवने पुरावे सादर केले नाहीत, पवार साहेबांची माफीही मागितली नाही आणि आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तो पुण्यात आला. म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिल्याप्रमाणे त्याच्या तोंडाला काळे फासले.

“केवळ प्रसिद्धीसाठी किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन कोणत्याही पुराव्याशिवाय आदरणीय पवार साहेबांवर टीका करणाऱ्या लोकांना आम्ही नामदेव जाधवच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की यापुढे कोणीही आदरणीय पवार साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याही तोंडाला काळे फासण्यात येईल.” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केली ‘ही’ मोठी मागणी

Share This News

Related Post

ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवार यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Posted by - March 4, 2022 0
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा झटका बसला आहे. याच…

सजग नागरिक घडविण्यासाठी छात्र संसद उपयुक्त – चंद्रकांत पाटील

Posted by - September 17, 2022 0
पुणे: देशात सजग नागरिक घडविण्यासाठी ‘भारतीय छात्र संसद’ सारखे उपक्रम उपयुक्त ठरतील आणि या माध्यमातून विविध कायदे तयार करताना चांगली…
Raj Thackeray

Raj Thackeray : घडाळ्यानं काटा काढला कि काट्यानं घड्याळ? राज ठाकरेंची टीका

Posted by - July 4, 2023 0
पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit Pawar) 9…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Posted by - September 11, 2023 0
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *