Pune News

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

457 0

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश गाडेकर, कार्याध्यक्षपदी विकास सूर्यवंशी तर सचिवपदी गणेश तामचीकर यांची निवड झाली आहे. ही निवड 2024या वर्षासाठी असणार असल्याची माहिती जिल्हा प्रधान सचिव संजय बारी यांनी दिली.

बिजलीनगर येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे झालेल्या शाखेच्या वार्षिक बैठकीत शाखा कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव संजय बारी, राज्य पदाधिकारी दिगंबर कट्यारे, मनीषा महाजन, उत्तम जोगदंड, जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब गस्ते, मनोहर पाटील, माजी सचिव स्वप्नील वाळुंज उपस्थित होते. सन्मानीय असलेल्या अध्यक्षपदी डॉ योगेश गाडेकर आणि उपाध्यक्षपदी शिवाजी मुरादे, क्रांती पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी पदाधिकारी निवड पुढीलप्रमाणे : बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह – अतिष शिंदे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह – अशपाक पिंजार, वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह – ज्ञानेश महाजन, महिला सहभाग विभाग कार्यवाह – भावना फुलझले, युवा सहभाग विभाग कार्यवाह – अशोक साळवे, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाह – राजकुमार माळी, सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग कार्यवाह – कृष्णा भिसे, कायदे व्यवस्थापन विभाग कार्यवाह – नेहा सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Share This News
error: Content is protected !!