पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी (Sanjay Raut) आज पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरदेखील निशाणा साधला. विरोधकांवर राजकीय सूडबुद्दीतून टीका केली जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विचारले असता सगळ्यात मोठा fraud झाला हा तर. 10 पक्ष बदललेला माणूस आहे अशी टीका त्यांनी केली. भुजबळ वेगळी तर फडणवीस वेगळी भूमिका घेतात. मुख्यमंत्री यांची भूमिका ही सरकारची असायला हवी असे संजय राऊत म्हणाले आहेत.