Pune News

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

376 0

पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Pune News) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती? कुणाला जास्त जागा मिळणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे. यादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.

पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचाच विजय होणार, अशा आशयाचे बॅनर्स रविवारी शहरात झळकले होते. भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली होती. अशातच आज सोमवारी शहरात रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत. शहरातील पर्वतीनगर भागात हे बॅनर्स लागले आहेत. “लोकांवर नाही, तर लोकांच्या मनात राज्य करणारे रविंद्र धंगेकर साहेब खबर पक्की विजय नक्की”, अशा आशयाचा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. सध्या या बॅनर्सची संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!