मुंबई : मिरा रोडमधून एक धक्कादायक घटना (Mumbai News) समोर आली आहे. यामध्ये क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिरा रोडच्या काशिमीरा परिसरात एका टर्फमध्ये बॉक्स क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली. हा तरुण अचानक खाली कोसळला आणि काही कळायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव pic.twitter.com/CGkjF1oEEe
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) June 3, 2024
काय घडले नेमके?
एका कंपनीकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत हा तरुण सहभागी झाला होता. मिरा रोडच्या काशिमीरा परिसरात एका टर्फमध्ये बॉक्स क्रिकेट खेळत असताना हा तरुण अचानक खाली कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. काशीगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. एका कंपनीकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या कंपनीचे कर्मचारी एकमेकांविरोधात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी हा तरुण एक चेंडू जोरदार मारताना दिसत आहे, मात्र त्यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू