Suicide News

Pune News : प्रेमात धोका मिळाल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्यातील घटना

695 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहित तरुणाने पत्नीसोबत पटत नसल्याचे व तिला सोडणार असल्याचे सांगून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याबरोबर प्रेमाच्या आणाभाका घेऊन नंतर तिची फसवणूक केल्याने पीडित तरुणीने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला. विवाहित तरुण आणि त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुरभी सचिन जगताप असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. चंदनची तीन वर्षांपूर्वी सुरभीशी ओळख झाली होती. त्याने तिला खोटे सांगून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझे पत्नीशी पटत नाही. मी तुझ्याबरोबर विवाह करतो, असे आमिष चंदनने तरुणीला दाखविले. चंदनच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्याची पत्नी लताला समजली. त्यानंतर चंदन आणि त्याची पत्नी लताने सुरभीशी वाद घालून तिला मारहाण केली. फसवणूक तसेच मारहाण करण्यात आल्याने सुरभीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी चंदन तेजवाणी आणि त्याची पत्नी लता तेजवाणी (दोघे रा. निगडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai : मुंबईतल्या ‘या’ 8 रेल्वे स्टेशन्सची नावे बदलणार

IPL 2024 : आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Vasant More : राज ठाकरेंकडे वेळ मागितली होती, पण…

Heart Attack : हार्ट अटॅक आल्यानंतर ‘हे’ उपाय केल्यास वाचू शकतो जीव

Helicopter Crash : हॉस्टेलवर कोसळलं सैन्यदलाचं फायटर हेलिकॉप्टर; Video आला समोर

Vasant More : ‘….अपमान किती सहन करायचा’, ‘मनसे’चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी

Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide