Pune News : पुरंदरमधील वाल्हे येथे घर, किराणा दुकानाला भीषण आग

708 0

पुरंदर : पुरंदरमधील वाल्हे येथे मुख्य बाजारपेठेतील राजकिशोर काबरा व राजगोपाल काबरा यांच्या घर व किराणा दुकानाला गुरुवारी रात्री 8 वाजता भीषण आग लागली. लाकडी इमारत असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीचे कारण अद्याप समजले नसले तरी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मदतकार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच जेजुरी येथून अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गावातील तरुणांनी व नागरिकांनी काबरा यांच्या दुकानात असलेले साहित्य हलविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काबरा यांच्या घराशेजारील इतर काही घरे जुन्या पद्धतीची असल्याने त्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र, युवकांनी व अग्निशमन दलाने आग पसरणार नाही याची दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!