Pune News

Pune News : मोदिजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

399 0

पुणे : दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांच्या जयंती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा (Pune News) अंतर्गत माझ्या जनसंपर्क कार्यालयात आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड तसेच आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर आयोजित केले आहे. या योजनेतील काही पात्र लाभार्थ्यांना आज नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हे कार्ड वाटप करण्यात आले.

देशातील सर्व शेतकरी, तरुण आणि मजूर, महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुले यांच्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जातात. देशातील नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मोदीजी यांनी आयुष्यमान भारत, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजना, डिजिटल इंडिया यासारख्या अनेक योजना आणल्या आहेत.

याच योजनेतील आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर औंध, औंध रोड, चिखलवाडी, बोपोडी, पुणे विद्यापीठ येथील नागरिकांसाठी आयोजित केले आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिबिराची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!