Breaking News
Ravindra Dhangekar

Pune News : पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप 11 च्या आत बंद करा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

538 0

पुणे : हुक्का पार्लर आणि पबमुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे गुन्हेगारी (Pune News) वाढत आहे. अशा हुक्का पार्लर आणि पबवर कडक निर्बंध असणे, ते बंद करणे गरजेचे आहे. मात्र, पोलिसांनी पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप हॉटेल्स यांना रात्री दीड पर्यंतची वेळ दिली आहे. हे चुकीचे आहे. ही वेळ तातडीने कमी करून या पाश्च्यात्य संस्कृतीला आवर घाला, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज केली.

पुणे शहर विद्येचे माहेरघर आहे. सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याकडे गौरवाने पाहिले जाते. अशा शहरात पब संस्कृती असेल किंवा हुक्का पार्लर संस्कृती वाढत आहे. या पाश्च्यात्य संस्कृतीला पोलिसांनी आळा घालणे गरजेचे आहे, याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लक्ष वेधून घेतले.

या विषयांवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. पण यात त्रुटी आहेत. रात्रीच्या दीड पर्यंत पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप हॉटेल्स सुरू ठेवायचे म्हणजे गुन्हेगारी वाढवायची, मुलांना व्यसनाच्या खाईत लोटायचे, असाच याचा अर्थ निघतो. त्यामुळे पोलिसांनी निर्णयाचा पुन्हा विचार करावा. पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप हे रात्री अकरा वाजण्याच्या आत बंद करावेत, अशी माझी मागणी आहे.

पालकांच्या भूमिकेत जावून विचार करा
तरुणांचे भविष्य वाचविण्यासाठी, शांत-सुसंस्कृत शहर हा पुण्याचा लौकीक टिकवून ठेवण्यासाठी, गुन्हेगारी थोपवून ठेवण्यासाठी कडक नियम असणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्री दीड पर्यंत दिलेली वेळ तातडीने कमी करावी. ठिकठिकाणी धाडी टाकून हुक्का पार्लर बंद करावेत. पुणे पोलिसांनी या विषयाचा पालकांच्या भूमिकेत जावून, अतिशय संवेदनशीलतेने विचार करतील, असे मला वाटते, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले धन्यवाद; विधिमंडळात नेमकं काय घडलं?

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’चं शूटिंग पूर्ण; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण लागू केल्याने छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारचे मानले आभार

Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा

HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधानसभेत एकमताने मंजूर

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Share This News
error: Content is protected !!