पुणे : उरुळीकांचनजवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत (Pune News) लहान मोठे पन्नास जण शनिवारी रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, चमत्काराचे प्रयोग सादर केले, भूतांची माहिती जाणून घेतली, त्यांना साद घातली, पण भुते काही दिसली नाहीत. स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात आणि त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, उंच शरीरयष्टी असते, हा समाज काही खरा ठरला नाही. मात्र इंद्रियजन्य भास आणि असे-असे भूत असते, या संस्कारातून भुताची कल्पना लोकांच्या मनांमध्ये रुजल्याचे सगळ्यांना मनोमन पटले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापुर ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी सातवाजेपासून रविवारी सकाळी सातवाजेपर्यन्त पन्नास जण स्मशानात मुक्कामी होते. यावेळी गावाचे सरपंच सचिन सातव, शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले, माजी सरपंच बबन साठे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मयूर पटारे, निशांत धाईंजे, प्रवीण खुंटे, रतन नामपल्ले, स्नेहल लांडगे,अनुज भुजबळ, मनोहर पाटील, समाधान भगत, नम्रता ओव्हाळ, राज भगत, ज्ञानेश महाजन, संजय निकम, योगेश हुपरिकर, मंगेश चित्ते, सुरज चव्हाण, विवेक इंगोले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.
‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे’, असे विशाल विमल यांनी सांगितले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik News : भाजप नेत्याच्या घराचे काम सुरू असताना 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट
Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री
Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या
Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता
Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन
Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी
Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग
Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक