Ajay Kamble

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

415 0

पुणे : नुकतंच लोकमान्य मल्टीपर्पस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने लोकगौरव विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता, आर्थिक, उद्योजकता आदी क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाचा सन्मान यावेळी करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील सामन्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

तरुण भारतचे सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सामान्यतील असामान्य कर्तुत्व दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रासाठी सामान्यतील असामान्य कर्तृत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे यांना लोकगौरव विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

त्याच बरोबर सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, पुढारी वृत्तपत्राचे संपादक सुनील माळी सामाजिक क्षेत्रासाठी मेघना महेंद्र सपकाळ, शिरीष मोहिते, विवेक वेलणकर ,डॉक्टर विनोद शहा, विजय शिवले ,राम बांगड. मुलाखतकार सुधीर गाडगिळ, क्रीडासमीक्षक सुनंदन लेले. यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!