ST

धावत्या एसटीची चाकं निखळली; 35 प्रवाशांचा जीव टांगणीला (Video)

470 0

पुणे : पुणे – नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यात आज सकाळी एक धडकी भरवणारी घटना घडली. यामध्ये महामार्गावर धावणाऱ्या एसटी (ST) महामंडळाच्या लाल परीची म्हणजे एसटी बसची मागची दोन्ही चाके अचानक निखळली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. चाकं निखळ्यानंतर एक चाक बसच्या पुढे आणि दुसरं चाकं रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात जाऊन पडले. या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी होते. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

काय घडले नेमके?
पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या शेवळेवाडी (Shevlewadi) परिसरात लालपरीची मागची दोन्ही चाके अचानक निखळली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. जवळपास 15 ते 20 सेकंद ही बस रस्त्यावर धावत होती. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. यामुळे ही बस तिरकी होऊन रस्त्यावर धावत होती. यामुळे बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये मोठ्या प्रमाणात आरडाओरड सुरु झाली.

आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ (Near Morde Chocolate Factory) ही घटना घडली आहे. एसटी बसचे चाकं निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे. परळ डेपोची (Paral Depot) बस क्रमांक एमएच 12 बीएल 3618 ही बस परळवरुन नारायणगावकडे निघाली होती. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!