पुणे महापालिकेने बजावली 478 धोकादायक वाड्यांना नोटीस;38 अतिजोखमीचे वाडे जमीनदोस्त

426 0

पुणे: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये अशी घरे पडण्याची दाट शक्यता असते.                                                                                                                                                  पीएमसी सरकारी नियमानुसार C१,C२ आणि C3 ला नोटीस बजावण्यात आली आहे.C१ म्हणजेच अति धोकादायक वाडे,यामध्ये 28 वाडे पाडण्यात आले आहेत. C2 म्हणजेच धोकादायक वाडे,शहरांमध्ये 316 धोकादायक वाडे असून त्यापैकी ११ वाडे आत्तापर्यंत पाडण्यात आले आहेत.तर C3 मध्ये 134 वाड्यांपैकी ९ वाडे पाडण्यात आले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी शहरातील एकूण 38 अतिजोखमीचे वाडे पुणे महानगरपालिकेने पाडले आहेत.पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या धोकादायक इमारती पाडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.पावसाळ्यात सीमाभिंत आणि जुन्या इमारती कोसळून जीवित हानी होत असल्याने,दरवर्षी सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.यंदाच्या पावसाळ्यात शहरातील एकूण 478 वाड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वाद कायम असतात.आणि त्यामुळे पालिकेला कारवाईसाठी वाट पहावी लागते. या कारणामुळे मालमत्तांचा पुनर्विकास वर्षानुवर्षी रखडला आहे.

Share This News
error: Content is protected !!