पुणे महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवात 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा

289 0

पुणे : आगामी गणेशोत्सवासाठीचं नियोजन पुणे महापालिकेकडून सुरू झालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत दीड दिवस, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विसर्जन हौदांची उभारणी केली जाते. त्यानुसार विसर्जन हौदांच्या उभारणीचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. यंदा घनकचरा विभागाकडून 150 फिरते हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

फिरत्या हौदांबरोबरच 135 स्थिर हौद विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडून स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार शहरात एकूण 285 विसर्जन हौद असतील. याशिवाय शहरात ठिकठिकाणी विसर्जन हौद उभारण्यात येणार आहेत. स्थिर हौदांची स्वच्छता, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था यासह आदी खर्चास मान्यता देण्‍यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!