पुणे- येत्या 6 तारखेपासून पुणे मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचवेळी पुणे मेट्रोसाठी मोठी नोकरभरती केली जाणार असून अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोणकोणत्या पदासाठी ही नोकरभरती केली जाणार आहे याची आपण माहिती घेऊ.
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी.या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 असणार आहे.
पद, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
महाव्यवस्थापक – उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक – उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
सहमहाव्यवस्थापक – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
उपमहाव्यवस्थापक – उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
व्यवस्थापक – उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक व्यवस्थापक – उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
अग्निशमन अधिकारी. – उमेदवारांनी Diploma in Fire पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो