सोशल मीडियावर पुणे मेट्रोतले भन्नाट किस्से व्हायरल !…पाहा व्हिडीओ

585 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. पण म्हणतात ना ‘पुणे तिथे काय उणे’. पुणेकरांनी चक्क मेट्रोमध्ये अशा काही मजेशीर गोष्टी केल्या कि पाहून तुम्हाला हि हसू आवरणार नाही. पुणेकरांच्या मेट्रोमधील मजेशीर व्हिडीओला जोड मिळाली आहे ती म्हणजे नेटकऱ्यांची.

लहान असो किंवा वृद्ध मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा मोह हा कोणालाच न आवरणारा आहे. असाच एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, एक व्यक्ती त्या आजोबांना विचारतो की मेट्रोमध्ये प्रवास करून कसं वाटत आहे? या प्रश्नावर हे आजोबा उत्तर देतात की, ‘मी आत्ताच या मेट्रोमध्ये बसलो आहे. पाच मिनीटांनी या मी सांगतो’

फुगडी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक खेळ. लग्न समारंभ, वरात, वारी, हळदीकुंकू अशा अनेक कार्यक्रमात स्त्री असो किंवा पुरुष हे फुगडीचा ताल धरतात. पण पुणेकर महिलांनी तर चक्क मेट्रोमध्येच फुगडी खेळली आहे. या महिलांच्या ग्रुपला मेट्रोमध्ये फुगडी खेळण्याचा मोह आवरलाच नाही.

या सर्व घटनांपलीकडे एका नेटकऱ्यानं सायकल घेऊन मेट्रोमधून प्रवास करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, ‘एक व्यक्ती मला म्हणाला, सायकलमुळे मेट्रो घराब होईल, त्याला मी उत्तर दिलं, पण पुणे स्वच्छ राहिल. पुणे मेट्रो ही खूप चांगली संकल्पना आहे. ‘

सोशल मीडियावरील हे मिम्स पाहून अशा प्रकारे मेट्रोचं स्वागत पुणेकरांकडूनच होणं शक्य आहे असं मत अनेकांनी मांडल आहे.

Share This News
error: Content is protected !!