LokSabha

Pune Loksabha : पुण्यातील मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

399 0

पुणे : देशातल्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकांचा मतदान पार पडणार असून पुणे लोकसभेसाठी मतदान 13 मे रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाली असून जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरासाठी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

हे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये निर्गमित करण्यात आले असून याद्वारे सर्व वाणिज्यिक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस फोन, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर विद्युत उपकरणे तसेच चिन्हांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत.

पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतूद व भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ नुसार दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला बसला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयने केली कारवाई

Punit Balan : अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवेद्य

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

 

Share This News
error: Content is protected !!