Laxman Kevte

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे अल्पशा आजाराने निधन

612 0

पुणे : एस .टी (ST) महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मण राव केवटे (Laxman Rao Kevte) यांचे बुधवारी रात्री अहमदनगर येथील माळीवाडा येथील आपल्या राहत्या घरी निधन (Pass Away) झाले आहे. ते 97 वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी अमरधाम अहमदनगर नालेगांव या ठिकाणी होणार आहे. 1 जून 1948 साली पुणे-नगर मार्गावर पहिली एसटी बस धावली. त्यावेळी पहिल्या एसटीचे चालक तुकाराम पठारे (Tukaram Pathare) आणि वाहक म्हणून लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते.

केवटे यांचा वैद्यकीय खर्च एसटीकडून करण्यात येत होता, आणि त्यांच्या मदतनिसालाही मोफत प्रवासाची सवलत एसटीकडून देण्यात येत होती. यासंदर्भातील प्रस्ताव मागच्या वर्षी एसटीच्या पुणे विभागाकडून शासनासमोर ठेवण्यात आला होता. अखेर राज्य शासनाने नोव्हेंबर 2022 मध्ये हा प्रस्ताव मंजूर केला होता.

Share This News
error: Content is protected !!