Pune Rain News

Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये पावसाने घातले थैमान

404 0

पुणे : मागच्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता पावसाने (Pune Rain News) दमदार पुनरागमन झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काल दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच पुण्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरू आहे. तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुण्याच्या कोथरूड, हडपसर, विद्यापीठ, विमाननगर भागात ढगाळ वातावरण तयार होऊन हळूहळू पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.

‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी
पुणे शहरातील बिबवेवाडी,अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला. त्यामुळे शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही वेळ नागरिकांना अडचणींचा सामना देखील करावा लागला. मुंबई, रायगड, जालना, औरंगाबाद, पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

तसेच पुढील 24 तासांत कोकणसह विदर्भातदेखील मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!