liquor

Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांसाठी मोठी बातमी ! गणेशोत्सवामुळे ‘या’ दिवशी पुण्यात मद्यविक्री राहणार बंद

512 0

पुणे : पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19 आणि 28 सप्टेंबरला दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे.

जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती 19 आणि 28 सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच 29 सप्टेंबरला पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडून देण्यात आले आहे.

नेमका काय आहे आदेश?
19 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर दोन्ही पूर्ण दिवस पूर्ण पुणे जिल्हा, 29 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री परवाना धारकांना दुकानं बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागातीलदेखील दुकानं बंद ठेवावे. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide