Pune Ganeshotsav 2023

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणपती वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला मारहाण; 4 जणांवर गुन्हा दाखल

586 0

पुणे : गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) काही दिवसांवर येऊन ठेपले असताना पुण्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकरणी दिनेश भिकाराम गोरा यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे 2 आणि अष्टविनायक मित्र मंडळाचे 2 अशा चौघांवर प्रथम खबरी अहवालाची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?
दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही तरुणांनी गोरा यांना तीन हजार रुपयांची वर्गणीची पावती दिली होती. यावेळी रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 तरुणांचा घोळका हा वर्गणी मागण्यासाठी किराणा दुकानात आला.

यावेळी गोरा यांनी एवढी रक्कम देऊ शकत नसून तुम्ही काहीतरी कमी करुन घ्या असे म्हणाले. यावेळी यातील एकाने त्याच्या कानाखाली मारली. पाठीमागे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करुन दमदाटी केली. तसेच पुन्हा दुकानात घुसून मारहाणदेखील केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!