Pune Fire

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

455 0

पुणे : पुण्यातून आगीची (Pune Fire) आणखी एक घटना समोर आली आहे. यामध्ये रविवार पेठेतील अतिशय गजबजलेला आणि व्यापारी केंद्र असलेल्या भोरी आळीतील काही दुकांनाना आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 गाडया तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

रविवार पेठेतील भोरी आळीतील रामसुख चेंबर्स आणि काही दुकानांना आज पाहते 5.10 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकुण 4 फायरगाड्या व 2 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुकानाला आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत सुदैवाने जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नाहीत. ही व्यावसायिक इमारत चार मजल्यांची असून या संपूर्ण इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. या आगीमध्ये शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पुर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!