पुणे : आज पहाटे 3.20 वाजता बिबवेवाडी, आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग (Pune Fire) लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि दोन वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खाञी करत चारही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पुर्ण विझवली.
आगीमध्ये गॅरेजमधील एकुण 17 चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे. जखमी वा जिवितहानी नाही.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे यांनी सहभाग घेतला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?