PUNE CRIME UPDATES : दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

436 0

पुणे : पोलीस पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एबीसी रोडवरील हॉटेल मेट्रोमध्ये रात्री उशिरा दारू पिऊन कर्मचाऱ्याला हाताने मारहाण आणि शिवीगाळ केली होती. तसेच बार काउंटरसमोर जाऊन धिंगाणा केला असल्याची तक्रार हॉटेल मॅनेजर कुणाल मद्रे यांनी केली होती.

अधिक वाचा : पुणे पोलीस दलातील ‘त्या’ तीन झिंगाट पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत केले असे कृत्य…

त्यानुसार तपास करून पोलीस कर्मचारी उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या तीनही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती समजते आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर यांनी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी काढले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!