पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या दुचाकी विकल्या आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या दुचाकी विकल्या आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माच्याऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली दिली.या गाड्या स्क्रॉपच्या असल्याचं सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनीच आपल्याला त्या बाजारात विकायला सांगित्या असं या आरोपीने म्हटलं आहे.
हे प्रकरण समोर येताच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Adv. Yashwant Jamadar : ‘ॲड. यशवंत जमादार’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक
Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात
Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती
Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका
Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक